ग्रोव्हिजन गटशेती संघाचे अकोला देव येथे चर्चासत्र संपन्न

18

टेंभुर्णी – शेतकर्‍यांनी शेतकर्‍यांची शेतकर्‍यांसाठी स्वयंप्रेरणेने चालविलेली संपुर्ण शेती चळवळ हे ब्रीद घेऊन चाललेल्या ग्रोव्हिजन गटशेती संघाचे प्रत्येक महिन्याच्या नऊ तारखेला होत असलेले नियमित मासिक चर्चासत्र मंगळवार ( दि.9 मे) रोजी जाफराबाद तालुक्यातील अकोला देव येथे मोहाच्या मळ्यातील श्री. गणपती मंदिरावर पार पडले.
ग्रोव्हिजन गटशेती संघाचे संस्थापक प्रमुख श्री. संजय मोरे पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात सीताफळ छाटणी, रेशीम उद्योग सह ग्रोव्हिजन गटशेती संघाच्या माध्यमातून स्थापन होत असलेल्या कंपनी बाबत माहिती दिली. या वेळी सीताफळ बागात शिवार फेरी करण्यात आली. कार्यक्रमास सर्वश्री दहिगाव येथील नंदकिशोर देशमुख, विश्वासराव देशमुख, सुंदरराव देशमुख, अकोला देवचे दत्तात्रय सवडे, रघुनाथ सवडे, वैभव सवडे, प्रमोद खरात, श्रीमंत सवडे, शालिकराम सवडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
वनभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.