भगवंताजवळ जायचं असेल तर मालक म्हणून नाही, सेवक म्हणून जायला पाहिजेत-मुनीश्री वीरसागरजी महाराज

15

जालना । प्रतिनिधी – आपल्याला मिळालेल पद फक्त संसारा साठी मर्यादित असते , ते समाज उपयोगी असते, ना कि भगवंताला दाखवण्यासाठी असते. भगवंताजवळ आपण सेवक म्हणून जायला पाहिजेत, त्यांची सेवा केली पाहिजेत ,भक्ती केली पाहिजेत तर त्याचे फळ खूप चांगले मिळते. चक्रवर्ती षटखंडाधिपती राजा महाराज पण जेव्हा भगवंताजवळ गर्भगृह मध्ये प्रवेश करत असतात, तेंव्हा आपले मुकुट काढून भगवंताची भक्ती- स्तुती सेवक बनून करत असतात .ते राजा असून सुद्धा मंदीरची साफसफाई करतात. या कारणामुळे त्यांना खूप कमी वेळेत मोक्ष मिळते. आपण जर छोटा मोठ्या पदाचा अहंकार मनात ठेवून भगवंता जवळ गेलो तर आपले कल्याण कसे होईल?, असे मुनीश्री वीरसागरजी महाराज म्हणाले.
उद्या गुरुवारी मुलनायक श्री 1008 श्रेयांसनाथ भगवंताचा गर्भ कल्याणक महामहोत्सव आहे. त्या निमित्ताने सर्वांनी भगवान श्रेयांसनाथजीं चा अभिषेक ,पूजन , शांतिधारा करण्याचे माणस ठेवले पाहिजेत , असे गुरुदेवांनी आपल्या प्रवचनातून इच्छा व्यक्त केली आहे. मीडिया प्रभारी संजय लव्हाडे ह्यांनी सांगितले की, संत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागरजी महाराजचे परम शिष्य निर्यापक श्रमन श्री वीरसागरजी महाराजांच्या सान्निध्यामध्ये गर्भ कल्याणक महामहोत्सवाचे भव्य आयोजन केले जाईल, ज्यात 1008 श्री श्रेयांसनाथ भगवंताचा अभिषेक , गुरुदेवच्या शुद्धवाणीतून भगवंताची महाशांतीधारा करण्याचे सौभाग्य सर्वांना मिळवायचे आहे , अशी गुरुदेवांची भावना, गुरुदेवांची आज्ञा आहे. आपण सर्वांनी शुद्ध सवळ्यातील धोती दुपट्टा परिदान करून मंदिरात यायचे आहे. या सोहळ्याचा लाभ आपण घेऊन मानव जीवन सार्थक करण्याचे आवाहन मंदिर ट्रस्टकडून करण्यात आले आहे.