श्री. ज्ञानयोग सेवा ट्रस्टचा वर्धापन दिवस साजरा केंद्रियमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवरांची सोहळ्याला उपस्थिती

17

सिंधुदुर्ग । प्रतिनिधी – श्री. ज्ञानयोग सेवा ट्रस्ट यांच्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त सद्गुरु आरोग्य सेवा केंद्र व स्व. विजया नाईक स्मृती गोशाळेचे भूमिपूजन सोहळा वायंगणी, वेगुर्ले येथे शौर्या इंटरप्रिसे तर्फे आयोजित करण्यात आला होता. तसेच श्री. ज्ञानयोग सेवा ट्रस्ट व श्री. सद्गुरु आरोग्य सेवा व निसर्गोपचार केंद्राचे लोकार्पण केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. वैकुंठवासी सौ. जनाबाई जगन्नाथ कणसे स्मृती प्रित्यर्थ मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत औषध वाटप सेवा उपचार शिबिर देखील घेण्यात आले. बाल कीर्तनकार चैतन्य महाराज राऊत यांचे शृश्राव्य कीर्तन प्रवचन, अस्मिता मिराणे प्रस्तुत जल्लोष महिलांचा व मुजिकल मेलेडी गीतांचा कार्यक्रम. समता फिल्म्स निर्मित महत्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक चित्रपटाचे प्रमोशन आणि ट्रेलर लाँच सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता. सादर कार्यक्रमाचा शेवट श्री. महापुरुष कलावैभव पारंपरिक दशावतार नाटकाने करण्यात आला. बाल कलाकार दक्ष व शिष यांनी आपल्या कलाकृतीतून कमावलेले पैसे देणगी देऊन सद्गुरू आरोग्य सेवेत हातभार लावला.
कार्यक्रमाचे आयोजन डॉ. राजेंद्र बबनराव खेडेकर व संभाजी जगन्नाथ कणसे शौर्या इंटरप्रिसेस, श्री द्यनयोग सेवा ट्रस्ट व मित्र परिवाराने केले होते. प्रमुख अतिथी निमंत्रक म्हणुन सौ. मनिषा राजेंद्र खेडेकर, सौ. गौरी संभाजी कामात- कणसे, श्री. किरण लक्ष्मण राऊत, सौ. कशिष किरण राऊत, डॉ. अपुर्व क्षिरसागर, डॉ.वैभव सोनवणे, डॉ. संतोष भोर, डॉ.शिरीष शेवाळ, डॉ. निलेश खामकर, डॉ.आनंद चव्हाण ज्ञानयोग सेवा ट्रस्ट डॉ. राजेंद्र खेडेकर मित्र परिवार होते. सादर सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रिय मंत्री श्रीपाद जी नाईक, शिक्षण मंत्री दीपक केसकर, शारदा ज्ञानपीठम चे पंडित वसंतराव गाडगीळ, मनसे नेते आप्पा आखाडे,शिवसेनेचे कुलदीप तात्या कोंडे, प्रसन्ना देसाई, सिने व बाल कलाकार शिष राजेंद्र खेडेकर व दक्ष राजेंद्र खेडेकर, चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तायडे, रणजितसिंह घोरपडे, सत्यशोधक चित्रपटाचे सर्व कलाकार आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.