जालना । प्रतिनिधी – येथील ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल जालनाची विद्यार्थिनी संबोधी संदीप इंगोले हिने बजाज नगर, वाळूज संभाजीनगर येथे पार पडलेल्या द व्हॉईस ऑफ टॅलेंट ड्युयेट व सोलो गीत गायन खुल्या स्पर्धेमध्ये तिने ड्युयेट मध्ये ’मेघा रे मेघा रे ’ या गीताला तिला प्रथम क्रमांक मिळाला तिला आनंद जोशी यांनी साथ दिली. सोलो गीत मध्ये अनिल दळवी प्रथम आले.या स्पर्धेमध्ये एकूण 32 स्पर्धक होते. पारितोषिक वितरण परिक्षक प्रसिध्द कराओके ट्रॅकर फारुक शेख व सुनिल पवार यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रतिभा सरपाळे,संतोष कुलकर्णी, यांनी केले तर सूत्रसंचालन श्री. राजु दिक्षित यांनी केले.