जालना । प्रतिनिधी – जालना येथील रत्नदीप सिनेमागृहात दिनांक 8 मे रोजी भारतीय जनता पार्टी व महिला मोर्चाच्या वतीने तसेच भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष व जालना विधानसभा प्रभारी श्री भास्कर आबा दानवे यांच्या सहकार्याने शहरातील तमाम महिला व युवतींना सध्याच्या अतिशय गंभीर आणि दाहक असलेल्या विषयावर ’द केरला स्टोरी’ हा चित्रपट मोफत दाखवण्यात आला.
याप्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशोक अण्णा पांगरकर, शहराध्यक्ष राजेश राऊत, जिल्हा सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे, भाजयूमो जिल्हाध्यक्ष भागवत बापू बावणे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर, स्वीय सहाय्यक सचिन जाधव, सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष शुभांगी ताई देशपांडे, महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस संध्याताई देठे,रुक्मिणी पवार , रेणुका निकम,शर्मिष्ठा कुलकर्णी, ममता कोंडीयाल, स्नेहा जोशी, सारिका दहेकर, शारदा काळे, मीना गायकवाड, गीता राजगुडे, वर्षा ठाकूर, विकास कदम, अमोल धानोरे, विठ्ठल नरवडे, याच्या प्रमुख उपस्थिती सह सर्व महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या, युवा मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते..
हा चित्रपट बघून मन आणि डोकं सुन्न झाले. हा चित्रपट नक्कीच विचार करायला लावतोय चित्रपटातील परिस्थिती पाहता महिला आणि खास करून युवा मुलींनी या चित्रपटातून बोध घेऊन अशी परिस्थिती आपल्यावर येऊ नये याची काळजी घ्यावी.
आजच्या युगातील युवतींनी अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून कायम जागृत राहिले पाहिजे, कोणत्याही प्रलोभनाना बळी न पडता कुटुंब वात्सल्याची जानिव ठेवून आपले आयुष्य घडविले पाहिजे.