महाराणा प्रतापसिंह स्वातंत्र्याचे जनक – सुर्यवंशी

24

जालना । प्रतिनिधी – स्वाभिमानाचे प्रतिक असलेले हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंह हे स्वातंत्र्याचे जनक असल्याचे प्रतिपादन हिंदु महासभा चे प्रदेश संघठन मंत्री धनसिंह सुर्यवंशी यांनी येथे केले. हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंह जन्मोत्सव निमित्त अखिल भारत हिंदु महासभाच्यावतीने मंगळवार (दि 9) रोजी शहरातील चमन येथे आयोजित अभिवादन प्रसंगी श्री सुर्यवंशी बोलत होते. यावेळी हिंदु महासभा देवगिरि प्रांत प्रमुख ईश्‍वर बिल्होरे, जिल्हाध्यक्ष तुकाराम मिसाळ, महाराणा ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुखलालसिंह राजपुत, कालुसिंह राजपुत, राजेंद्र हेकाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रसंगी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेवर पुष्पवर्षाव करुन महापुरुषांच्या नावाने जय घोष करण्यात आला. यावेळी बोलतांना श्री. सुर्यवंशी म्हणाले की, महाराणा प्रतापसिंह यांनी विदेशी आक्रमणकारी राष्ट्र विघातक शक्तींचा विरोध करण्यासाठी तळागळातील माणुस संघठित करुन हिंदुत्वाचा यज्ञ प्रज्वलित केला व स्वातंत्र्याचे महत्व पटवुन देत प्रत्येकाला स्वाभिमानाचे महत्व पटवुन दिले म्हणून आजही महाराणा प्रतापसिंह यांचे नाव स्वाभिमानाचे प्रतिक व स्वातंत्र्याचे जनक म्हणून ईतिहासात सुवर्ण अक्षरात नोंद आहे असेही श्री सुर्यवंशी म्हणाले. यावेळी बिल्होरे, राजपूत यांनी महापुरुषांचे राष्ट्रनिर्माण या संदर्भात विचार प्रगट केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नारायण त्रिंबके, योगेशसिंह वर्मा, शिवप्रसाद राठी, अजिंक्यराजे जाधव, उत्तम शिलगे, रवि शिकरे, सागर पिंपराळे, प्रमोद पाटील, अभिजितसिंह राजपूत आदींनी परिश्रम घेतले.