जाफराबाद । प्रतिनिधी – जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर कराटे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . तीन दिवस चालणार्या या शिबिरास पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. सरपंच गजानन लहाने, उपसरपंच सैय्यद हबीब सैय्यद कमाल, डॉ. अभिषेक देशमुख, आदिच्या उपस्थितीत कराटे प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ करण्यात आला. हे प्रशिक्षण शिबिर तीन दिवस चालणार आहे . गर्ल सेल्फ डिफेन्स कराटे शिबिरात सर्वांनी सहभाग नोंदवावा . स्वसंरक्षणासाठी मुलांना व मुलींनी कराटे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे , या प्रशिक्षणाने आपण स्वतःचे रक्षण करण्यासाठी सक्षम होऊ शकतो असा विश्वास यावेळी बोलतांना सरपंच गजानन पाटील लहाने यांनी व्यक्त केला.
या वेळी प्रशिक्षक म्हणून सातार्याचे संतोष माने, अमन देशमुख, नाजिम सय्यद, विनोद खरसान, दिनेश वाघमारे, शिवान साठे , गणेश साबळे, शेख नीसार भाई , पत्रकार बाळासाहेब गव्हले उपस्थित होते. यावेळी उपस्थित मुलांनी कराटे प्रशिक्षणाने आपण स्वतःचा बचाव कसा करु शकतो याचे प्रत्यक्षिक करून दाखविले.