जालना : येथील अंजानी फाऊंडेशन च्या वतीने पाचवी ते बारवी पर्यतच्या शालेय विध्यार्थी यांना मोफत शिकवणी वर्ग सुरू करण्यात येणार आहे.
वंचित, दुर्लक्षित घटकातील, कुटुंबातील मुला ,मुलींना महागडे कोचिंग क्लासेस लावणे शक्य होत नाही, ही बाब लक्षात घेत बालाजी किरवले यांनी ‘शैक्षणिक उपक्रम’ या उपक्रमाच्या माध्यमातून मोफत कोचिंग क्लासेस शिकवणी वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अंजानी फाऊंडेशनच्या माध्यमातून हे मोफत कोचिंग क्लासेस सुरू करण्यात येणार असून या क्लासेसचा फायदा होतकरू, गरीब विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन फाऊंडेशनचे संस्थापक बालाजी किरवले यांनी केले आहे. शिकवणी वर्गात प्रवेशासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे.
9168567111या क्रमांकावर नोंदणी करवि अधिक माहिती साठी फाऊंडेशनच्या अध्यक्षा ज्योती आडेकर, सचिव विद्या जाधव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मोफत कोचिंग क्लासेस सद्या जालना शहर पुरत मर्यादित आहे याची नोंद घ्यावी