जालना । प्रतिनिधी – जालना शहरातील रस्त्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली होती. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने सदरील रात्यावरून जाणे-येणे साठी शहरातील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत होता, खराब, खड्डेमय झालेले रस्ते तात्काळ सिमेंटीकरण करणेसाठी नागरिकांची मागणी होती. याच मागणीची दखल घेत केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नाने जालना शहरातील रस्त्यांसाठी सुमारे 14 कोटी रुपये मंजूर झाले. तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यात आणखी निधी आणण्याचे प्रयत्न सुरु राहतील रस्ते झाल्यावर दळणवळणाची चांगली सोय होणार आहे, शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे यांनी केले.
यामध्ये जालना शहरातील पोलीस ट्राफिक ऑफिस ते देवचंद चत्रभुज पेट्रोलपंप पर्यंत सिमेंट रोड बांधकाम करणेसाठी 200 लक्ष, चमन ते स्वामी विवेकानंद पुतळ्यापर्यंत सिमेंट रोड साठी 400 लक्ष, काशी विश्वेश्वर मंदिर ते गोपीनाथ मुंडे चौकापर्यंत सिमेंट रोड साठी 200 लक्ष, शिंदे बाल रुग्णालय ते कृष्णा ट्राली नवीन मोंढा पर्यंत सिमेंट रोड साठी 200 लक्ष फुल बाजार ते नेहरू रोड सराफा गोल मस्जिद पर्यंत सिमेंट रोड साठी 400 लक्ष या प्रमाणे विकास कामे होणार आहेत.
यापूर्वी हि जिल्हा वार्षिक योजना सन 2023 अंतर्गत केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नातून रु.27.31 कोटी व महाराष्ट्र शासनाने रु. 10 कोटी निधी मंजूर झाला होता व जालना शहरातील रस्त्यासाठी 14 कोटी रुपये एवढा निधी दि.08 में 2023 रोजी मंजूर झाला आहे. एकूण सुमारे रु.51.31 कोटी शहरातील रस्त्यांसाठी मंजूर झाले. यामुळे शहरातील रस्त्याचा कायापालट होणार असून रस्ते गुळगुळीत होणार आहे. या रस्त्याच्या सिमेंटीकरण करणेसाठी निधी मंजूर केल्याने शहर वासियांनी केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब दानवे यांचे आभार मानले आहे.