33 वर्षांपूर्वीचे वर्गमित्राकडून सेवापुर्ती निमित्त सत्कार

26

जाफराबाद । प्रतिनिधी – जाफराबाद तालुक्यातील वर्गमित्र 1990 च्या बॅचमधील वर्गमित्राकडून सेवापुर्ती निमित्त जिल्हा परिषद शिक्षक तथा शिक्षण सम्राट संजय लहाने यांचा जाफराबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितच्या सेव्हन स्काय मल्टिपल संकुल मध्ये सत्कार करण्यात आला.1990 च्या बॅच मधील विद्यार्थी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत असताना या बॅचमधील अनेक विद्यार्थी हे उच्च पदावर पोहोचले असुन,यामध्ये श्री संजय लहाने यांनी राजकीय, सामाजिक सह तालुक्यातून शिक्षण सम्राट म्हणून नाव लौकीक मिळविला आहे.तर व्यापारी वर्गातून हिंदुस्थान मशीनरी चे संचालक सय्यद पठाण, तर सामाजिक राजकीय क्षेत्रात माजी सैनिक तथा शिवसेना तालुका प्रमुख कुंडलिक पाटील मुठ्ठे, उद्योजक बळीराम भालके, शिक्षक संजय लोखंडे, अभय मेठी व्यवसाय क्षेत्रात श्री भगवान चव्हाण उत्कृष्ट शेतकरी व धार्मिक क्षेत्र श्री बाबुराव मोरे शिक्षक श्री कांतीलाल हे नगरपंचायत कर्मचारी श्री मुरारी जाधव अन्य वर्गमित्रांनी आपापल्या क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. सत्कारमूर्ती श्री संजय लहाने यांनी आपल्या सत्काराला देताना आपण हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत शिक्षकाची नोकरी मिळावत एक एक यशाचा टप्पा पार केल्याचे सांगितले.
यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित वर्गमित्र श्री कुंडलिक मुठ्ठे (तालुकाप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)शिक्षक संजय लोखंडे, दत्ता गाडेकर, शंकर चव्हाण, बाळूसिंह भारदवाज, रामदास टाले, कांतीलाल बसवाल, जितेंद्र खंडेलवाल, बळीराम भालके, अरुण हिवाळे, शिवनाथ वाकडे, बाबुराव मोरे, भगवान चव्हाण, जितेंद्र कळंबे, अभय मेठी, मुरारी जाधव, सय्यद पठाण, गजानन भालके, सूर्यकांत खरात, संदीप जाधव, अशोक गाडेकर, संदीप इंगळे, उदय मुळे, हिरालाल बनलस्वाल, सुभाष मोरे, भास्कर गोरे, जनार्दन चव्हाण, सह मोठ्या संख्येने मित्र परिवार हजर होता.