अतीघन आंबा लागवड तंत्र विषयावर ऑनलाइन वेबीनार संपन्न

12

टेंभुर्णी – आंबा फळ हे फळांचा राजा म्हणून सर्वसामान्यान पासून श्रीमंत लोकांपर्यंत अत्यंत आवडीचे फळ आहे. यामुळे या फळाला बाजारात विशेष मागणी राहते. या फळ पिकाच्या उत्पादणातून शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने केव्हीके, वाशिम च्या वतीने आधुनिक पद्धतीने आंबा लागवडीस प्रोत्साहन देण्याकरिता जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी स्वखर्चाने अभ्यास दौर्‍याच्या आयोजन मागील महिन्यात करण्यात आले होते व याची फलपूर्ती म्हणून शेतकरी मोठ्या पद्धतीत आंबा लागवडीस तयार झाले. सदर शेतकर्‍याना आधुनिक लागवड तंत्राची माहिती देण्याच्या हेतूने कृषि विज्ञान केंद्र, करडा, वाशिम व महाकेशर आंबा बंगाईतदार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने अतीघन आंबा लागवड तंत्र या विषयावर दिनांक 06 मे 2023 रोजी ऑनलाइन वेबीनार चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नंदलाल काळे, अध्यक्ष, महाकेशर आंबा बंगाईतदार संघ यांची तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जेष्ठ अंबा तज्ञ डॉ. भगवानराव कापसे व निवृत्ती पाटील, उद्यानविद्या तज्ञ, केव्हीके, वाशिम यांची उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ रवींद्र काळे, प्रमुख, केव्हीके, वाशिम, शंकरराव तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, वाशिम, डॉ संजय पाटील, आंबा तज्ञ, सेवा निवृत्त कृषि अधिकारी अनिल बोंडे, रवी काळे, तहसीलदार आणि मंडळ कृषि अधिकारी रवींद्र जयताळे यांची उपस्थिती लाभली.
तांत्रिक सत्रात डॉ. भागवनरव कापसे यांनी यांनी उपस्थित शेतकर्‍यांना अतीघन आंबा लागवड तंत्रज्ञान याबद्दल सविस्तरपणे मार्गदर्शन करीत भारतातील व महाराष्ट्रातील या पिकाची सद्यस्थिती मांडत कमी उत्पादकतेची कारणे विषद करीत 1.5 ु 4 मी अंतरावर अतीघन पद्धतीने लागवड करून, वळण व छाटणी तंत्र आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यास 6 टन एकरी उत्पादन घेणे सहज शक्य होत असल्याचे सांगितले व लागवड तंत्रा बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. निवृत्ती पाटील यांनी अतीघन आंबा लागवडीचे अर्थशास्त्र विषद करीत ग्रामीण युवकांना या माध्यमातून आपल्या गावातच रोजगार उपलब्धी होऊ शकते असे विषद करीत येत्या हंगामात किमान 25 बागांची प्रायोगिक तत्वावर लागवड करण्यात येईल असे सांगितले. डॉ. रवींद्र काळे यांनी केव्हीके च्या माध्यमातून शेतकार्‍याना संपूर्ण तांत्रिक पाठबळ देऊन या पिकाच्या माध्यमातून पीक बदल करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल असे सांगितले. शंकरराव तोटावार यांनी शास्वत पाण्याची उपलब्धता असल्यावरच आंबा लागवडीचे नियोजन करावे व त्याकरिता कृषि विभागाच्या विविध योजनाच्या माध्यमातून जल संवर्धन व शेततळे करावे असे आवाहन केले. अनिल बोंडे यांनी विदर्भात आंबा पिकाला मोठा वाव असून लागवडिसोबतच प्रक्रिया व विक्री या बाबिवर प्रकाश टाकला.
अध्यक्षीय मार्गदर्शनात नंदलाल काळे यांनी संघाची भूमिका व कार्यपद्धती विषद करीत जिल्ह्यातील शेतकार्‍याना संपूर्ण सहकार्य व मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन गोपाल बोरकर यांनी तर आभार प्रदर्शन रवींद्र जयताळे यांनी केले. वाशिम व इतर जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकार्‍यानी या कार्यक्रमाचा लाभ घेतला