जालना | प्रतिनिधी – श्री.म.स्था.जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,जालना येथे दि.६ में २०२३ वार-शनिवार रोजी विद्यालयात राजश्री छत्रपती शाहु या महाराज यांचा स्मृती दिन उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एस.एम.वानगोता यांनी प्रतिमेस माल्यार्पन करुन अभिवादन केले.व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच विद्यालयातील सहशिक्षक श्री.आवटे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची ओळख करून दिली.प्राथमिक शिक्षणाची मुहूर्तमेढ शाहू महाराजांनी रोवली.सर्वधर्म समभावाची भावना त्यांनी त्यांच्या कार्यातून समाजात रुजवली.याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.मतकट्टे सर,श्री.शिंदे सर व विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्त पर्यवेक्षक श्री.मतकट्टे सरांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.तसेच विद्यालयाचा वार्षिक निकाल जाहीर करुन विद्यार्थ्यांना प्रगती पुस्तक देण्यात आला.