मंगळवारी परतूर येथे रिपब्लिकन सेनेचा स्वाभिमानी बहुजन मेळावा

13

जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

जालना | प्रतिनिधी – परतूर येथे रिपब्लिकन सेना जालना जिल्ह्यच्या वतीने दि. 9 मे रोजी दुपारी 1 वाजता धम्मदिप बुध्द विहार मैदान प्रबुध्द नगर परतूर शहर येथे स्वाभिमानी बहुजन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याला सरसेनानी आनंदराज आंबेडकर  प्रमुख मार्गदर्शन करणार आहे.
या मेळाव्याला केंद्रीय सचिव संजीव बोधनकर, प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून या मेळाव्याप्रसंगी विविध जाती-धर्मातील लोकांचा आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थिती प्रवेश होणार आहे. तरी जालना जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, कामगार आघाडी पदाधिकारी युवक आघाडी व महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पश्चिम जिल्हाध्यक्ष लिंबाजी वाहुळकर, पुर्व जिल्हाध्यक्ष दिनेश आदमाने, जालना जिल्हा महासचिव चंद्रकांत खरात, जिल्हा संघटन मच्छिंद्रअप्पा खरात, सर्जेराव अंभोरे, जिजा वाघमारे, सुरेश वानखेडे, शुभम हिवराळे, भिमराज खरात, दादु गरबडे, जयपाल भालके, गोरख अपुट, नवनाथ ठोके, अरूण म्हस्के, समाधान खरात, मधुकर म्हस्के, विशाल छडीदार, बाळु गरबडे, शेख जब्बार, रवि शेंडगे, ज्ञानदेव खरात, कैलास लहाने, दिनेश वाहुळे, कांताबाई बोर्डे, शोभाबाई म्हस्के, प्रिया जैन, वंदानाबाई प्रधान, सुरेखाबाई तेजाळ, शांताबाई हिवाळे, इंदुबाई लहाने आदींनी केले आहे.