घनसावंगी तालुक्यातील गुरुपिंपरी सोसायटी भाजपाच्या ताब्यात

40

राष्ट्रवादी कॉग्रेस पुरस्कृत माजी सभापती श्री.बाबासाहेब कोल्हे यांच्या पॅनलचा सुपडा साफ

जालना | प्रतिनिधी – घनसावंगी तालुक्यातील मौजे गुरुपिंपरी विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरुस्कृत माजी सभापती तथा समर्थ सहकारी साखर कारखाणा व जिल्हा मध्यवृत्ती बँकेचे संचालक श्री.बाबासाहेब कोल्हे यांच्या पॅनलचा सुफडा साफ करुन भाजपा-शिवसेना (ठाकरे गट व शिवसेना (शिंदे गट) पुरुस्कृत समृध्दी शेतकरी ग्राम विकास पॅनलने विजय खेचून आणला  12 पैकी 7 जागेवर बहुमताने विजय खेचून आणला आहे. मौजे गुरुपिंपरी ता.घनसावंगी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी मागील 25 वर्षापासून बिनविरोध राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती, परंतु या वर्षी भाजपा नेते केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे, भाजपा नेते तथा समृध्दी शुगर साखर कारखाण्याचे चेअरमण श्री.सतीषराव घाटगे पाटील व माजी आ.विलास बापु खरात यांच्या नेतृत्वाखाली समृध्दी शेतकरी ग्राम विकास पॅनल निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरविले 13 पैकी एका जागेवर भाजपाचे श्री. लक्ष्मण बोरडकर हे या  पुर्वीच बिनविरोध निवडूण आले होते उर्वरीत 12 जागेवर जबरदस्त लढत होऊन काटयाची टक्कर झाली,राष्ट्रवादी कॉग्रेसचे बाजूने समर्थ सहकारी साखर कारखाण्याचे माजी संचालक व जिल्हा मध्यवृत्ती बॅकेचे संचालक माजी सभापती आणि सतत 15 वर्ष सरपंच व चेअरमण पद भोगनारे श्री.बाबासाहेब कोल्हे, माजी सरपंच श्री.राजु आन्ना कोल्हे,विधमान चेअरमण उध्दव मुरलीधर कोल्हे यांच्या सारखे मातबर स्वत: निवडणुकीच्या रिगनांत उतरले होते आणि भाजपा पुरुस्कृत समृध्दी शेतकरी ग्राम विकास पॅनल मध्ये सर्व सामान्य, नवखे कार्यकर्ते निवडणुक रिगनांत उतरले होते विद्यमान संचालक श्री.उध्दव मुरलीधर कोल्हे यांनी हेतुपूस्करपणे भाजपा सेनेच्या अनेक शेतकऱ्यांची नावे मतदार यादीमधून वगळली  होती आणि आपल्या जवळील शेतकऱ्यांची नावेच फक्त यादी मध्ये ठेवली होती यामुळे मतदारामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता तसेच घनसावंगी तालुक्यातील बदलेले राजकिय समीकरणे आणि भाजपा नेते श्री.सतिष घाटगे पाटील यांच्या घनसावंगी तालुक्यातील झंझावातामुळे आणि समृध्दी साखर कारखाण्यामुळे गुरुपिंपरी येथील शेतकरी ऊसाच्या कचाटयामधून बाहेर पडले आणि सोसायटीच्या निवडणुकीत परिवर्तन घडून आनले व निवडणुकीच्या मैदाना मधील 12 पैकी 7 उमेदवार प्रचंड मतानी विजयी झाले, निवडून आलेल्या उमेवारामध्ये १) अभिमन्यु कुंडलिक कोल्हे 168 मत्ते, अरविंद उत्तमराव कोल्हे 168 मत्ते,गोवर्धन उत्तमराव कोल्हे 181 मत्ते, प्रल्हाद नानाभाऊ कोल्हे 170 मत्ते, रामराव घनशाम शिंदे  165 मत्ते, आशामती केशव कोल्हे 164 मत्ते, दौलत आन्ना थोरात 170 मत्ते आदीसह उमेदवार विजय झाले. विजयी उमेदवाराचे केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.रावसाहेब पाटील दानवे, भाजपा नेते श्री.सतिष घाटगे,माजी आ.विलास बापू खरात,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री.भास्करराव पाटील दानवे, केंद्रीय मंत्री मा.ना.श्री.रावसाहेब पाटील दानवे यांचे स्वीय सहाय्यक श्री.गोवर्धन अप्पा कोल्हे यांनी अभिनंदन केले.