जमात-ए-इस्लामी हिंद जालना तर्फे ईद-मिलन कार्यक्रमाचे आयोजन जगात अशी समाज व्यवस्था स्थापन करण्याची गरज आहे जिथे जकात घेणारे कोणी नसावे – डॉ. वाजेद अली खान

38

जालना । प्रतिनिधी – जमात-ए-इस्लामी हिंद जालना आयोजित ईद-मिलन चा संदेश, जगात शांतता आणि सुव्यवस्था या शीर्षका खाली डॉ.वाजेद अली खान नाशिक म्हणाले की, जमात-ए-इस्लामी हिंद भारतात 75 वर्षां पासून सेवा करत आहे. जमातचे सर्वात मोठे यश म्हणजे त्यांनी इस्लामचे साहित्य वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतर करून तयार केलेले आहे. ईद मिलन कार्यक्रमाची सुरुवात(आरंभ ) शेख सलीम यांच्या पवित्र कुराणाच्या पठणाने झाली, मराठी अनुवाद डॉ. अब्दुल लतीफ यांनी सादर केले . प्रस्तावना शहर अध्यक्ष शेख इस्माईल जालना, यांनी आपल्या प्रस्तावनेत सांगितले कि सर्व धर्मीय लोकांनी गुण्या गोविदयाने मिळून मिसळून राहावे, ईद मिलन कार्यक्रमाच्या माध्यमातून बंधुभाव निर्माण व्हावे. सर्व धर्मातील लोकांनी एकत्र यावेत असे ते म्हणाले .विशेष अतिथी डॉ.राधेशाम जैस्वाल म्हणाले की, जगात जेव्हा जेव्हा बिगाड अत्याचार निर्माण झाले तेव्हा तेव्हा जगाच्या निर्मात्याने (ईश्वराने ) आपले प्रेषित पाठविले. समाजातील दुष्कृत्ये दूर करण्यासाठी आणि शांततेचे प्रसार करण्यासाठी त्यांचे प्रेषित (इशदूत) जगात आले. सनत निरंकारी मिशन एक ईश्वरदाचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.त्यानंतर डॉ.राजेंद्रगाडेकर म्हणाले की, मला जमात-ए इस्लामी हिंद च्या कार्यावर मला समाधान आहे. हे जमात समाजाला जोडण्याचे काम करत आहे. इस्लामिक सोसायटी विभागाचे सचिव हाफिज तहसीन आलम म्हणाले की, रमजानची महाणता पवित्र कुराणा मुळे आहे. चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी ईश भय आवश्यक आहे. उपवासातून इशभय निर्माण होतो. त्यानंतर , फादर चाणक देव गणपती भाकरे म्हणाले की, जगात दोनच जाती आहेत, एक पुरुष आणि दुसरी स्त्री . भारतातील जनतेने एकात्मतेने राहून जनतेची सेवा केली पाहिजे.अध्यक्षीय भाषणात डॉ.वाजिद अली खान म्हणाले की. आपल्या देशात असा समाज निर्माण करण्याची गरज आहे जिथे जकात घेणारे कोणी नसावे .त्यांनी इस्लामची शिकवण स्पष्ट केली.आणि म्हणाले की सर्व धर्माच्या लोकांनी इस्लामचा सखोल अभ्यास केला पाहिजे आणि त्याचा सदविवेक बुद्धीने विचार केला पाहिजे. त्यांनतर भिक्षु शिवली शाकायपुत्र नालंदा बुद्ध विहार म्हणाले कि आम्ही सर्व एक सर्वांचे रक्त सारखेच आहे, म्हणून आम्ही माणसे जोडण्याचा कार्य करावा , एकात्मतेत ताकद असते. फूट पाडा आणि सत्ता हस्तगत करा च्या नितीला( धोरणे) ही समजून घेणे महत्त्वाचे आहे. इकबाल पाशा साहेब, म्हणाले ’’मजहब नही सिखाता आपस में बैर रखना आम्ही प्रेमाने राहून भारत देशाला पुढे नेण्या मध्ये सहकार्याची भूमिका बजावली पाहिजे.दावत विभागाचे सचिव काझी गालिब यांनी कृतज्ञता व्यक्त केली तर जनसेवा विभागाचे सचिव सय्यद शाकीर यांनी सूत्रसंचालन केले.मोठ्या संख्येने जालन्यातील लोकांनी सह भाग नोंदविले,सर्वांना शिरखुर्मा देऊन मेजवानी देण्यात आली. सहभाग नोंदविलेल्या लोकांनी मराठी भाषेतील इस्लामिक विषयाच्या साहित्याची पुस्तके घेतली.