जालना । प्रतिनिधी- मराठा महासंघाच्या जालना शहर कार्याध्यक्षपदी अमोल नागवे यांची सर्वांनुमाते निवड करण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांच्या सूचनेवरून कोषाध्यक्ष अशोक पडुळ यांनी अमोल नागवे यांची शहर कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कै. आण्णासाहैब पाटील यांचे विचार तळागाळापर्यत पोहचवण्याचे काम करावे आणि समाजाचे प्रश्न आणि अडचणी मार्गी लावण्यासाठी नेहमी तत्पर राहुन कार्य करावे, असे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांनी नियुक्ती पत्रात नमूद केले आहे. या नियुक्तीबद्दल जिल्हा सरचिटणीस संतोष कर्हाळे, ड. शैलैश देशमुख, रविकुमार सुर्यवंशी, बाबा राउत, ड. लक्ष्मण ऊढाण, सुभाष चव्हाण, मंगेश मोरे यांनी अमोल नागवे यांचे अभिनंदन केले आहे. या नियुक्तीबद्दल अमोल नागवे यांनी पदाधिकार्यांचे आभार व्यक्त करून जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा महासंघाचे संघटन वाढविण्यासाठी सतत प्रयत्न सुरू राहू आणि कामाच्या माध्यमातून आपणावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.