शहरातील हातपंपांची दुरुस्तीची मागणी

12

परतूर प्रतिनिधी – परतूर शहराच्या अनेक भागातील हातपंप दुरुस्ती अभावी बंद पडले आहेत.सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. पालिकेकडून पुरेसा पाणी पुरवठा केला जात नसल्याने पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. शहरातील नादुरुस्त हातपंप दुरुस्त केल्यास नागरिकांचा पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही.
उन्हाळ्याचे दिवस आणि वाढती पाण्याची मागणी लक्षात घेता पालिका प्रशासनाने तातडीने हातपंप दुरुस्तीची मोहीम हाती घ्यावी. पालिका प्रशासनाने या मागणीची दखल न घेतल्यास पालिका प्रशासना विरोधात भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगरसेवक कृष्णा आरगडे यांनी दिला आहे.