मिठालाल सकलेचा यांचे निधन; मृत्यू पश्‍चात नेत्रदान

23

जालना । प्रतिनिधी – श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे माजी संघपति, प्रसिद्ध उद्योगपति मिठालाल घीसूलाल सकलेचा यांचे वयाच्या 78 व्या वर्षी गुरुवार (दि 4) रोजी सकाळी 8.30 वाजता निधन झाले. धार्मिक प्रवृत्तिचे होते. सामाजिक कार्यात अग्रेसर होते. त्यांच्या मृत्यूनंतर परिवाराने नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असलेल्या सकलेचा परिवाराचा हा निर्णय स्व. मिठालाल सकलेचा यांच्या रुपात अन्य कुणाला दृष्टि मिळणार आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने मृत्यूनंतरही स्व. मिठालाल जग पाहणार! म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सामाजिक कार्यात अन्नदान, धनदान, रक्तदानाच्या माध्यमातून दाता असलेल्या सकलेच्या परिवाराने नेत्रदान करून सामाजिक जाणिवेचा परिचय करून दिला आहे.
स्व. मिठालाल सकलेचा यांच्या पश्‍चात पत्नी, चार मुली, जवाई, एक मुलगा, सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मिठालाल सकलेचा यांच्या पार्थिवावर गुरुवार (दि 4) रोजी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. मृत्यूनंतर त्यांच्या परिवाराने नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आणि गणपती नेत्रालयाच्या डॉक्टरांनी ते कार्य पुर्ण केले. महेंद्र सकलेचा यांचे वडील व सुभाषचंद सकलेचा, गौतमचंद, अशोकचंद, सुदेश सकलेचा, संजयकुमार, सज्जन सकलेचा यांचे ते चुलते होत.