टेंभुर्णी । प्रतिनिधी – एक मे 2023 रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कुंभारझरी येथे कुंभारझरीचे सरपंच सौ निर्मलाताई विजय परिहार यांचेकडून स्वर्गीय ज्योतीताई विजय परिहार मा.सरपच यांचे स्मृती प्रित्यर्थ 26 जानेवारी 2023 रोजी झालेल्या लेझीम पथकातील विद्यार्थ्यांना ट्रॉफी चे वाटप करण्यात आले तसेच जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कुंभारझरी येथे उत्कृष्ट कार्य करणार्या शिक्षकांना ट्रॉफी देऊन सन्मानीत करण्यात आले याप्रसंगी गावातील सरपंच ,उपसरपंच व सर्व सदस्य तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य शिक्षण प्रेमी नागरिक व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते तसेच दरवर्षीप्रमाणे कुंभारझरी जिल्हा परिषद गटाचे सदस्य सन्माननीय शालिकराम पाटील म्हस्के साहेब यांचेकडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी भाजपा युवा तालुकाध्यक्ष श्री विजय परिहार ,केंद्रप्रमुख सुधाकर चिंधोटे, उपसरपंच अजय पैठणे के.एस. चाटे, काशिनाथ उखर्डे,आर.पी.बनकर ,बाबुराव वाघ,शिवाजी इंगळे,सोपान शिंदे,राजू चींधोटे ,शंकर चव्हाण,साहेबराव चव्हाण,गजानन दुंड्यार,संतोष माळी, रविंद्र पैठणे, संतोष पैठणे,सुनील चव्हाण, पांडूरंग चव्हाण, कौतिक चव्हाण, अंबादास माळी ,कीसन चव्हाण, रहेमान शहा, भगवान चव्हाण , व भाजपा युवा विजय परीहार मित्र मंडळातील कार्यकर्ते उपस्थित होते .