टेंभुर्णी । प्रतिनिधी – टेंभुर्णी येथील खूप जुनी असलेली सुशिक्षित बेरोजगार संचलित श्री रंगनाथ महाराज दूध उत्पादक संस्थेची 48 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 30/4/2023 रोजी संस्थेच्या उपाध्यक्ष सौ. सत्यभामा तांबेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी पुढील पाच वर्षासाठी अध्यक्ष पदी सौ. सत्यभामा तांबेकर यांची तर उपाध्यक्ष पदी ड.किशोर फुले व सदस्य पदी बालाजी मुळे यांची निवड झाली माळी महासंघाचे तालुकाध्यक्ष श्री संजय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा शाल श्रीफळ हार देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे सचिव पी. जी. तांबेकर यांनी प्रस्ताविक केले. सोसायटीचे चेअरमन रावसाहेब अंभोरे, पत्रकार व व्यापारी महासंघाचे जिल्हा सदस्य अलकेश सोमानी, व पत्रकार तथा माळी महासंघाचे तालुका अध्यक्ष संजय राऊत यांची भाषणे झाली.
यावेळी डॉ.अविनाश सुरुशे डॉ.रमेश मोठे,बालाजी फुले,गणेशलाल सोमाणी , विजय तांबेकर ,कल्पेश सोमाणी ,शंकर गाडेकर ,ज्ञानेश्वर तांबेकर,विष्णू सांगुळे ,संजय मूळे ,बालाजी मगर,सारंगधर पवार,संदीप देशमुख ,रवि तांबेकर.यांची उपस्थिती होती.