जयंती निमित्त रॅली व महा बुध्दवंदनेचे आयोजन

27

जालना । प्रतिनिधी – जगाला विज्ञानवादी धम्म सांगणारे विश्‍ववंदनीय तथागत गोतम बध्द यांची 2567 वी जयंती वैशाख पोर्णिमा (दि.5 मे) रोजी सकाळी रॅली व महा बध्दवंदना आयोजित करण्यात आली आहे. नुतन वसाहत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सकाळी 7.30 वाजता अभिवादन करुन रॅलीस सुरुवात होणार आहे. ही रॅली नुतन वसाहत, शनिमंदीर, चमन मार्गे मस्तगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजबळ रॅलीचा समारोप होणार आहे. या ठिकाणी सकाळी 8.30 वाजता महा बुध्दवंदना व धम्मदेसना होणार आहे. या रॅलीत नागेवाडी येथील भन्ते सिवली शाक्यपुत्र, साळेगाव येथील भन्ते रेवत तसेच नागेवाडी येथील श्रामनेर संघ सहभागी होणार आहे.
यावेळी बुध्द जयंती साजरी करण्यासाठी बौध्द बांधवांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करुन रॅलीत सहभागी व्हावे. असे आवाहन उपासक महेंद्र रत्मपारखे, भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद मगरे, जिल्हा महासचिव संजय हेरकर, भास्कर घेवंदे, राजकुमार दांडगे, माधूरी मोरे, अरुण मगरे, हरिष रत्नपारखे, मिलींद बोर्ड, भारती हेरकर, गयाबाई साळवे, कांताबाई रत्नपारखे, राजेश ओ. राऊत, मधुकर गायकवाड, भास्कर शिंदे, छाया हिवाळे, नितिन निसर्गन, भिकाजी साळवे, साधना बनकर, विलास इंगळे, सिध्दार्थ गजभिये, अनुराधा हेरकर, वंदना इंगळे, कविता मगरे आदींनी केले आहे.