टेंभुर्णी । प्रतिनिधी – वाघ्रुळ(ज.) ता.जालना येथिल शिक्षक श्री.प्रमोद पवार यांची नुकतीच वाघ्रुळ (ज.)येथुन कें.प्रा.शा.सावंगी तलाव येथे जिल्हांतर्गत बदली झाल्याने दिनांक 1 मे रोजी वाघ्रुळ केंद्रांतर्गत शिक्षकांबद्दल कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता.उत्कृष्ट तंत्रस्नेही असलेले शिक्षक श्री प्रमोद पवार यांनी आपल्या 8 वर्षे सेवेच्या काळात विद्यार्थी गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना,केंद्रांतर्गत सर्व शाळांची आनलाईन कामे,शिक्षकांच्या सेवापुस्तिका अद्ययावत करुन पीडीएफ व आनलाईन करणे, शालार्थ पगारबीले, आयकर गणना, नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षा इत्यादी क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल वाघ्रुळ केंद्राच्या वतीने त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.
यावेळी केंद्रप्रमुख विजय चित्ते, शिक्षक नरेंद्र पुजारी, देवेंद्र बारगाजे, माणिकराव मांटे यांनी विविध आठवणींना ऊजाळा दिला तेव्हा सर्व वातावरण अत्यंत भावुक झाले होते. यावेळी शालेय व्यवस्थापण समिती माजी अध्यक्ष अशोक खांडेभराड, माजी सरपंच विकास बोर्डे, ग्रामपंचायत सदस्य गीताराम तिडके, लंकाबाई खरात, शिक्षण विस्तार अधिकारी राम खराडे, केंद्रप्रमुख श्री.राजकर, श्री भिसे, शेळके बापु, अशोक ऊबाळे, विनोद भोजराज, सुभाष भडांगे, गणेश भुतेकर, पोलीस जमादार उगले यांसह ग्रामस्थ, मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रमोद नाईक यांनी तर आभार प्रदर्शन श्री शत्रुघ्न काळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती मंजुश्री खरात, अपर्णा जोशी, विलास घुगे, माणिकराव मांटे, विक्रम गुठे, सतीष पडघान, सुरेश पारीख, जमील शेख, तहनियत शेख यांनी परिश्रम घेतले.