भोकरदन । प्रतिनिधी – भोकरदन येथील छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये टेलरिंगचा व्यवसाय करणारे दुकानदार व मटन विकणारे दुकानदार एकाच ठिकाणी असल्यामुळे अनेक वर्षापासुनचा दुर्गंधी हटवण्याचा हा प्रश्न आहे.
छ. शिवाजी मार्केट मधील मटनाच्या दुकानांमध्ये कोंबडे बकरे यांची कत्तल करण्यात येते आणि त्यापासूनचे रक्त व उर्वरीत अवशेष व मास त्या ठिकाणीच टाकण्यात येत असल्यामुळे त्याची दुर्गंधी सुटते गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न सतत नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांकडे संबंधित टेलर मंडळी मांडत आलेले आहेत परंतु नगरपरिषदेच्या सुस्त प्रशासनाला या व्यवसायिकांच्या बद्दल थोडी सुद्धा तळमळ वाटत नाही त्यामुळे नगरपरिषदेमार्फत हा प्नश्न कायमस्वरुपी सोडविण्यात आला नाही उलट हा प्रश्न चिघळत ठेवण्यात आलेला आहे. असे प्रसार माध्यमांशी बोलताना बोरशे गुरुजी म्हणाले यावेळी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते त्यामध्ये भोकरदन शहराध्यक्ष महेजादखान ,तालुका अध्यक्ष सोळंके पाटील, यांच्यासह पार्टीचे कार्यकर्ते सत्तार शहा,प्रभाकर सुरडकर,अर्जुन तळेकर, गणेश वाघ,सचिन तळेकर, राजीव वाडेकर, कृष्णा तळेकर, संजय क्षिरसागर, मतीन शहा, मोहसीन शहा, शेख सरफराज, महंमद युनूस,दादाराव गारखेडे, मनोहर गायकवाड, सुनील जैन, हरिदास पगारे, शेख साबिर,राहुल पारखे,जैन टेलर्स.इ हजर होते. या बाबत
सविस्तर असे की,दुर्गंधीमुळे या ठिकाणी ग्राहक जास्त येत नाहीत. दुकानदारांना या दुर्गंधीच्या मरणयातना सहन करुन आपला व्यवसाय करावा लागतो त्यामुळे जेमतेमच व्यवसाय चालतो टेलर मंडळीचा आरोग्याचा व पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. नगरपरिषदेचा मात्र टॅक्स भरण्यासाठी तगादा सुरू आहे. या व्यवसायिकांच्या प्रश्नाबाबत आम आदमी पार्टी तर्फे मुख्याधिकारी नगरपरिषद भोकरदन यांना एक निवेदन देण्यात आले आहे. दुर्गंधी हटवण्यासाठी नगरपरिषदेने लक्ष न दिल्यामुळे या व्यवसायिकांचं अतिशय नुकसान झालेलं आहे या झालेल्या नुकसानीस नगरपरिषद भोकरदन चे प्रशासन व स्वतः मुख्याधिकारी नगरपरिषद भोकरदन हे जबाबदार आहेत त्याबाबत या टेलरिंग व्यवसायिकांना नुकसान भरपाई द्या. टेलरिंग व्यवसाय करणार्या या शिवाजी मार्केट मधील दुकानदारांना टॅक्स माफ करा . मटन विक्रेतांना दुसर्या अधिकृत ठिकाणी स्वतंत्र असे दुकाने द्या किंवा टेलरिंग व्यवसायिकांना कायमस्वरूपी दूसर्या ठिकाणी स्वतंत्र असे दुकाने द्या आणि हा प्रश्न तात्काळ सोडवा दुर्गंधीच्या मरण यातना मधुन सुटका करा अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आलेली आहे नगरपरिषदेने वेळेत लक्ष न दिल्यास आम आदमी पार्टी तर्फे नगर परिषद भोकरदन मुख्याधिकार्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे . यामध्ये टेलरिंग व्यवसाय करणारे दुकानदार व आम आदमी पार्टीचे पदाधिकारी , कार्यकर्ते सहभागी होणार आहेतअसा इशारा या निवेदनात देण्यात आलेला आहे.एक आठवडा वाट पाहुन नंतर योग्य पाऊल नगरपरिषदे मार्फत उचलण्यात न आल्यास आमरण उपोषणाची नोटीस नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांना देण्या येईल असे ही बोरशे गुरुजी म्हणाले.