जालना । प्रतिनिधी – शहरातील व्यापारी शुभम् ट्रडिंग कंपनी व बार्शी येथील व्यापारी निवास ट्रेडींग कंपनीमध्ये ब्रोकर कडुन झालेल्या चुकीमुळे व गैरसमजुतीमुळे न्यायालयात वाद प्रलंबीत होता. दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी आयोजित राज्यस्तरीय लोक अदालत मध्ये न्यायालयाने तथा दोघांपक्षकारांकडुन झालेल्या मध्यस्तीमुळे दोघांमधील गैरसमज दुर होऊन वाद संपुष्टात आला व दोघांमध्ये पुन्हा व्यवहार सुरु झाले. न्यायालयीन वाद मिटल्यास मनभेद सुध्दा दुर होऊन लोक एकत्र येतात. सदर मध्यस्ती व लोकअदालत मध्ये वाद मिटविण्यासाठी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. राहुल चव्हाण, प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती मोहिते, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव प्रणिता भारसाकडे, पॅनल प्रमुख श्रीमती एम. आर. खनवे, सह दिवाणी न्यायाधील वरिष्ठस्तर जालना, पॅनल सदस्य अॅड. श्रीमती आर. जी. दिपवाल, श्री अॅड. दिपक ना. कोल्हे जिल्हा सहाय्यक सरकारी अभियोक्ता, श्री अॅड. महेश सिताराम धन्नावत, , अॅड. रोहिणी पुरी, एडवोकेट बॉबी अग्रवाल, एडवोकेट अश्विनी धन्नावत, एडवोकेट श्वेता यादव, एडवोकेट दिपाली आंबेकर ,एडवोकेट दिपक महाजन, एडवोकेट प्रदीप कुलकर्णी यांनी प्रयत्न केले.
महाराष्ट्र लिटीगंटस् असोसिएशनचे अध्यक्ष सी.ए. गोविंदप्रसादजी मुंदडा तथा सचिव श्री नरेंद्रजी मोदी यांनी प्रतिपादन केले की, लोकामध्ये मतभेद अ शकतात, मात्र मनभेद न ठेवता लोकांनी लोकअदालतचा फायदा घ्यावा. तर अॅड. महेश धन्नावत यांनी प्रतिपादन केले की, लोकअदालत हि संकल्पना प्राचीन काळातील असुन याला जनअदालत असाही म्हटले जाऊ शकते, ज्यामध्ये कोणाची हार किंवा जित होत नाही, तर दोघेजन समाधानाने आपले वाद मिटवुन एकत्र येतात तथा न्यायालयाकडुन यामध्ये भरलेली कोर्ट फी सुध्दा परत दिली जाते. त्यामुळे व्यापार्यांनी यासाठी पुढे यावे व आपसातील वाद मिटवुन व्यवहार सुरळीत करावे.