सफाई कर्मचार्‍यांची कार्यशाळा संपन्न

14

जालना  :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय समता पर्व कार्यक्रमाअंतर्गत सफाई कर्मचारी व त्यांचे पुनर्वसन या विषयावर कार्यशाळा दि.27 एप्रिल 2023 रोजी जालना येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टाऊन हॉल येथे संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव पी.पी.भारसाकडे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त अमित घवले, सफाई कर्मचारी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष किरण इंगळे, मुख्य मार्गदर्शक ङ ज्ञानेश्वर शेंडगे आदीची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळा यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि नगर परिषद जालना यामधील कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.