परतुर | प्रतिनिधी- आष्टी व परतुर कृषी उत्पन्न बाजार समिती साठी झालेल्या निवडणुकीमध्ये आष्टी येथे भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीचा पराभव करत विजय संपादन केला असून परतुर येथे भाजपा ला 10 जागांवर यश मिळाले असून भारतीय जनता पार्टी ने आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी विजयानंतर बोलताना दिली
भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी सेवा सोसायटी मतदारसंघात विजय संपादन केला असून त्यांच्यासह पॅनलचे सर्व उमेदवार विजय झाले असून येणार्या काळामध्ये आष्टी व परतुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासासाठी कुठलीही कमतरता भासू देणार नाही असे आश्वासन यावेळी आमदार लोणीकर यांनी दिले
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकर्यांसाठी जास्तीत जास्त सुविधा पुरवण्याचा आपला माणूस असून आष्टी आणि परतूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकर्यांना उच्च दर्जाच्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे
यावेळी विजयानंतर प्रतिक्रिया देताना राहुल लोणीकर म्हणाले की परतुर व आष्टी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये जनतेने आमच्यावर दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ करून दाखवनार असल्याचे सांगतानाच हा विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी आमची असल्याची यावेळी बोलताना त्यांनी सांगितले
तर आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन करत 16 जगावर यश संपादन करत आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व सिद्ध केले आहे
यावेळी विजयी उमेदवार राहुल लोणीकर, बाळासाहेब आकात लक्ष्मण टेकाळे गुलाबराव अवचार हरिराम माने शहाजी राक्षे भुजंगराव धुमाळ, पाराजी मुळे संभाजी वारे, दिपाली प्रशांत बोनगे, कविता गणेश आंबेकर, मदन रामराव हजारे, मेराज खतिब, पद्माकर कवडे व्यापारी मतदारसंघातून दिनेश कुमार होलानी व सत्यनारायण अग्रवाल आधी उमेदवार विजयी झाले असून आष्टी येथे ही रमेश भापकर रामप्रसाद थोरात अशोक बरकुले शत्रुघ्न कणसे, संपत टकले, उद्धव गुंजाळ, मुरलीधर केकान सिद्धेश्वर सोळंके, लहाने विनायक भीमराव सिद्धेश्वर केकान, सिताराम राठोड रत्नमाला लक्ष्मण टेकाळे ज्योती तुकाराम सोळंके, उद्धव गुंजाळ योगेश मोरे, बालाप्रसाद सारडा, खंदारे प्रभाकर, आशा 16 जागांवर दणदणीत विजय संपादन केला आहे