जालना । प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या’ मन की बात’ या कार्यक्रमाचा शंभरावा भाग रविवारी आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित झाला. या कार्यक्रमाचा जनतेला लाभ मिळावा, यासाठी भाजपच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक पांगारकर यांनी मुक्तेश्वर हॉल येथे ’ मन की बात’ कार्यक्रम ऐकण्यासाठी विशेष आयोजन केले होते. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विशेष उपस्थिती लावली.
पंतप्रधान मोदी यांच्या मन की बात चे प्रसारण देशातच नव्हे तर परदेशातही एकाच वेळी प्रसारित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्य व्यक्तींच्या कलाकृतीचा समावेश करत सर्वसामान्य व्यक्तीचे जीवनमान उंचावण्याचं काम केलं.
देशाचा पंतप्रधान मनमोकळेपणाने आपल्याशी बोलतो अशी भावना या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाली जगातील सर्वात जास्त एकाच वेळी सामान्या जनतेशी संवाद साधण्याचा विक्रमच आज झाला असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या 100 व्या भागानंतर दिली आहे.
सदरील कार्यक्रमाचे जालना शहरातील मुक्तेश्वर हाल येथे प्रसारण करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन अशोक पांगारकर यांनी केले होते. यावेळी भाजपा जिल्हा ऊपाध्यक्ष भास्कर दानवे, संजय शिंगारे, सिद्धिविनायक मुळे, विनोद शिंगारे भागवत बावणे तसेच भाजपच्या महिला पदाधिकारी शुभांगी देशपांडे, विश्वनाथ शिरसागर, रामेश्वर गडगिळे, कैलास पिंपळे, दत्ता राऊत, राजेंद्र वाघमारे, मोहन अबोले, भोजराज, ज्ञानेश्वर सोनवणे, अरुण गाडे, संजय चौधरी, चंद्रकांत उबाळे, तुकाराम मिसाळ, अजय मिसाळ, कैलास सोनवणे, प्रतीक पांगारकर, विजय देशमाने, आदी, कार्यकर्त्यांसह वकिल, डॉक्टर, इंजिनिअर, जेष्ठ नागरिकांची व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना नामदार दानवे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.’ मन की बात’निमित्ताने चित्रकार अरविंद देशपांडे यांनी बेटी बचाओ, शिक्षण, पर्यावरण आदी विषयांवर चित्रप्रदर्शनाचे आयोजन केले होते, या चित्र प्रदर्शनास नामदार दानवे यांनी भेट दिली.