जालना । प्रतिनिधी – हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचा जिल्हास्तरीय लोकार्पण कार्यक्रम ढोरपुरा (रामनगर) येथे दि.1 मे 2023 रोजी सकाळी 10.00 वा करण्यात येणार आहे. यामुळे लोकांना उत्तम आरोग्य सेवा भेटणार आहे.
15 व्या वित्त आयोगातंर्गत जालना जिल्हयाकरीता शहरी भागामध्ये आरोग्य सेवा पुरविण्याकरीता सन 2022-23 मध्ये 20 शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रे मंजूर आहेत. महाराष्ट्रात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या उपक्रमाचे दि. 1 मे 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डिजिटल उद्घाटन होणार आहे. जालना जिल्हयात एकुण 20 शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र मंजुर असुन प्रत्येक तालुक्यात 1 या प्रमाणे सुरुवातीला 8 आपला दवाखाना’ कार्यान्वित करण्यात येणार आहे. याकरिता आरोग्य विभागाकडुन औषधी, साधनसामुग्री व मनुष्यबळ कंत्राटी तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. प्रति आरोग्य वर्धिनी केंद्रामध्ये वैद्यकिय अधिकारी, स्टाफ नर्स, एमपीडब्लू तसेच सपोर्ट स्टाफ यांचा समावेश आहे. आपला दवाखाना जिल्हास्तरीय लोकार्पण कार्यक्रम ढोरपुरा(रामनगर) येथे दि.1 मे 2023 रोजी स.10.00 वा करण्यात येणार आहे.