जाफराबाद । प्रतिनिधी – जाफ्राबाद तालुक्यातील खासगाव येथे रविवार (दि 30) रोजी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास तुफान गारपीट आणि वादळी वार्यासह पाऊस झाला. या मध्ये शहरातील व्यापार्याची आणि परिसरातील शेतकर्यांची खूपच तारांबळ झाली. गोटी सारख्या आकाराच्या गारांचा पाऊस पडला आहे. 30 मिनिटे ते 40 मिनिटे पडलेल्या पावसाने जणू काही पावसाळाच सुरू झाला की काय असेच चित्र निर्माण झाले.
गेली तीन दिवसापासून तालुक्यात दररोज पाऊस पडत आहे,ज्यामुळे लग्न समारंभ तसेच इतर उन्हाळी कार्यक्रम करतांना संयोजकांची तारांबळ होत. आज जाफराबाद सह भारत त्याचबरोबर, गोंदणखेडा, नळविरा या परिसरातील गावांमध्ये तुफान गारपिटास पाऊस झाला. असल्याचे चित्र दिसत आहे. उन्हाळ्यातही पावसाची व स्वरूप आल्यामुळे, नागरिक शेतकरी हैराण झालेली आहे. गारपिटास पाऊस जोरात असल्यामुळे पावसाळ्याचे दिवसाचे स्वरूप आल्यामुळे, त्याचबरोबर शेतकर्यांची उन्हाळी पिकांची नासाडी सुरू झालेली आहे. तालुक्यात कॅबिनेट मंत्र्याचा दौरा असताना, ते जाताच गारपिटीला सुरुवात झाली. तालुक्यातील सर्व शेतकर्यांनी सर्व पुढार्यांनी एकमुखी मागणी करावी व शेतकर्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे पंचनामे करून तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी सर्व शेतकर्यांची मागणी आता जोर धरू लागली आहे. विविध प्रकारचे नियम अटी न लावता सरसकट शेतकर्यांना मदत करावी असा आता सूर निर्माण झालेला आहे. शेतकर्यांच्या अडचणींना पारावर नसतो नैसर्गिक आपत्ती, त्याचबरोबर अनेक संकटांना शेतकर्यांना तोंड द्यावी लागत असतात. शेतकर्यांच्या मालाला भाव नसतो कधी शेतकर्यांच्या कापसाला भाव नसतो. आधी शेतकर्यांना कांदा रडतो तर कधी शेतकर्यांना अशा अवकाळीदारांनी रडवतात आणि त्यामुळे त्यांच्या समस्यांना परावर नसते. त्यामुळे शेतकर्यांची मागणी आहे की आता आम्हाला सरसकट अनुदान द्यावे.
टेंभुर्णी येथील माजी सरपंच तथा सोसायटीचे चेअरमन गणेश धनवाई, व्हाईस चेअरमन अंकुश पाटील, यांनी आमच्या वृत्त प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की शेतकर्यांच्या समस्यांना परावर नसते शेतकर्यांना कोणीही विचारत नाही त्यांच्या मालाला भाव नसतो आणि अशा वेळेस नैसर्गिक आपत्ती आल्यास तर संकटांना त्यांना सामोरे जावे लागते अशा वेळेस सरकारने सर्व शेतकर्यांना सरसकट अनुदान द्यावे, सर्व शेतकर्यांची एकमुखी मागणी आहे.