टेंभुर्णी – येथील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयात जागतिक पुस्तक दिन रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिव्यांग कवी आकाश देशमुख हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे सपोनि रविंद्र ठाकरे, शिक्षक सखाराम बोरकर, साहित्यिक पी.जी.तांबेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल वाघ, वाचनालयाचे प्रमुख रावसाहेब अंभोरे आदिंची उपस्थिती होती.
यावेळी सर्वप्रथम ग्रंथालयातील प्रमुख ग्रंथांचे पुष्प अर्पण करून पुजन करण्यात आले. आजच्या मोबाईल युगात ग्रंथ चळवळ जोपासणे आवश्यक झाले असून यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज असल्याचे मत शिक्षक बोरकर यांनी व्यक्त केले. यावेळी सपोनि रवींद्र ठाकरे, शेख साबेर, शेख नसीम, पी.जी.तांबेकर आदिंनी आजच्या काळात ग्रंथांचे महत्त्व या विषयावर आपले विचार व्यक्त केले. सुत्रसंचलन व प्रास्ताविक शिक्षक दिनकर ससाने यांनी केले. तर रावसाहेब अंभोरे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला विष्णू सांगुळे, प्रा. दत्तात्रय देशमुख, सर्जेराव कुमार, फकरु कुरेशी, प्रा.सैलीप्रकाश वाघमारे, अशोक पाबळे, प्रदीप मघाडे, आशपाक शेख, भास्कर देशमुख, राजेश शेवाळे, अनिकेत अंभोरे, सोहम गुजरकर, हरीभाऊ सोनाळे, आदींची उपस्थिती होती.
फोटो -टेंभुर्णी येथे जागतिक पुस्तक दिनानिमित्त पुस्तकांचे पुजन करताना मान्यवर.