जाफराबाद | प्रतिनिधी – येणाऱ्या काळातील नवोदय परीक्षा तालुक्यासह जिल्ह्याभर पारदर्शी राबवा अश्या आशयाचे निवदन कुंडलिक पा मुठ्ठे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुका प्रमुख जाफ्राबाद यांच्या सह जाफराबाद तालुक्यातील पालक यांनी शिक्षणाधिकरी जि. प. जालना व उपजिल्हाधिकरी केशव नेटके, जिल्हाधिकरी कार्यालय जालना यांना दिले आहे. येणाऱ्या दि. २९ एप्रिल रोजी नवोदयच्या होणाऱ्या परीक्षा पारदर्शी, किंवा सी सी टिव्ही कॅमेरे लावुन घेण्यात याव्या,अथवा बैठे पथक स्थापन करावे, जेणेकरून ग्रामीण भागातील अभ्यासु, होतकरू व गरीब विद्यार्थी याचे नुकसान होणार नाही. व वसिलेबाज विद्यार्थी व दूजाभाव करणारे शिक्षक यांना चाप बसेल. अशी रास्त मागणी पालकांसह जाफराबाद तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी निवेदन देताना तालुका प्रमुख कुंडलिक पा मुठ्ठे, विभाग प्रमुख विष्णु लोखंडे, पत्रकार प्रल्हाद जाधव,पालक दिनकर नवले, सलमान पठाण आदी शिवसैनिक हजर होते.