परतूर | प्रतिनिधी – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १२ संचालकांच्या निवडीसाठी आज शुक्रवार दि. २८ रोजी निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पडली. परतूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीसाठी भाजपा, राष्ट्रवादी, काँगेस यांची अनोखी युती पहावयास मिळाली. यात शिवसेनेचे ठाकरे गट आणि शिंदे गट वेगळे पडल्याचे दिसले. सायंकाळी चार वाजेपर्यंत ९५.३२ टक्के एकुण मतदान झाले. यावेळी युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष राहुल लोणीकर, मा. आ. सुरेशकुमार जेथलीया, जिल्हाध्यक्ष कपिल आकात सह अनेकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, रविवारी दि.३० एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता शहरातील गटसाधन केंद्र येथे मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक अधिकारी प्रणव वाघमारे यांनी दिली. दरम्यान, यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी राजू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.