जालना – जिल्हा फलोत्पादनमध्ये अग्रेसर असून मोठयाप्रमाणात विविध योजनांच्या अर्थसहाय्यव्दारे फळे व भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आलेली आहे. विशेष: मोसंबी द्राक्ष, डाळिंब, आंबा, , या फळपिकांची व विविध भाजीपाला व कांदा पिकांची व्यवसायीक दृष्टीकोणातून लागवड करुन नवनविन तंत्रज्ञानाचा वापर करुन निर्यातक्षम दर्जाचे उत्पादन करण्यात येत आहे. जागतिक बाजारपेठेतील ग्राहकांबरोबरच स्थानिक बाजारपेठेतील ग्राहकामध्ये आरोग्याच्या सुरक्षतेबाबत विशेषतः किडनाशक उर्वरित अंशबाबत जागरुकता निर्माण झालेली आहे. किटकनाशकांच्या अतिवापरामुळे आरोग्याच्या सुरक्षतेबाबत “सुरक्षीत अन्न पिकवा ” ची अंमलबजावणी करणेबाबत. केंद्रशासनाने सुचित केलेले आहे. तसेच स्थानिक बाजारपेठेतील ग्राहकांना किटकनाशक उर्वरीत अंशाची हमी देण्याकरीता “भारतीय अन्न सुरक्षा मानक प्राधिकरणाने अधिकतम उर्वरीत अंश मर्यादा निर्धारीत केलेल्या आहेत. सध्याची वस्तुस्थिती लक्षात घेऊन जास्तीत जास्त फळे व भाजीपाला पिकांचे उत्पादन करुन युरोपीयन व इतर देशांना निर्यात निर्यात करण्याच्या उद्देशाने युरोपियन देशांनी किडनाशक उर्वरित अंश मुक्तची हमी अट घातल्याने सन २००४-०५ पासून राज्यात अपेडाच्या मार्गदर्शनाखाली ग्रेपनेट या ऑनलाईन कार्यप्रणालीव्दारे निर्यातक्षम द्राक्षबागांची ऑनलाईन नोंदणी करण्याची कार्यवाही करण्याचे आवाहन जालन्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री जी आर कापसे यांनी केले .
आंब्याकरीता मॅगोनेट डाळिंबाकरीता अनारनेट भाजीपाला पिकाकरीता व्हेजनेट व संत्रा, मोंसबी, लिंबु करीता सिट्रसनेट, खाण्याचे पान करिता बिटल नेट, कांदा करीता ओनियननेट व बोर, लिची, पायनापल, वॉटरचेस्टनट, वुडअॅपल, केळी, जांभूळ, पेरू, सीताफळ, ड्रगन फ्रुट्स, अंजीर, स्त्रोबेरी व चिक्कू या फळ पिकांचे ऑदरफ्रुटनेट या ऑनलाईन नोंदणी प्रणाली अपेडाच्या वेबसाईटवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. सदर प्रणाली करुन जास्तीत जास्त फळे व भाजीपाला पिकांची नोंदणी करण्याकरीता शेतकऱ्यांसाठी नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
सन २०२३-२४ मध्ये द्राक्ष, आंबा, डाळिंब, भाजीपाला, संत्री, मोसंबी, लिंबु व इतर पिकांचे हॉर्टनेट ट्रेसिबीलीटीव्दारे निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्याच्या कामाकरीता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, यांच्या कार्यालयातील कृषि उपसंचालक “समन्वय अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. निर्यातक्षम बागाची तपासणी करण्याकरीता जिल्हयातील सर्व कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक व कृषि अधिकारी यांनी तपासणी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आली आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन श्री जी .आर .कापसे यांनी केले आहे.