विविध खेळाच्या मोफत उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात नाव नोंदणी करुन सहभागी व्हावे

27

जालना  :- जिल्ह्यात खेळांचा प्राथमिक कौशल्य विकास व नवीन विद्यार्थी खेळाडूंना खेळाची आवड निर्माण होण्यासाठी फुटबॉल, खो-खो, तलवारबाजी, योगासन, कबड्डी, तायक्वांदो, टेनिक्वाईट, नेटबॉल, सेपाक टकरा, स्केटींग, बॉक्सींग, आर्चरी, सॉफ्टबॉल आणि बेसबॉल खेळाच्या प्रशिक्षण शिबिराचे दि.3 ते 12 मे 2023 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी मोफत उन्हाळी प्रशिक्षण शिबिरामध्ये नाव नोंदणी करुन सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले आहे.

जिल्ह्यात खेळाचा प्रचार व प्रचार होवून जास्तीत जास्त खेळाडूंचा सहभाग व संघाची संख्या वाढवणे यावर लक्ष केंद्रीत न करता गावपातळीपासून चांगले खेळाडू तयार होण्यासाठी 8 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर खेळनिहाय व शारिरीक क्षमता खेळांचे प्राथमिक कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिरांचे दरवर्षी  आयोजन करण्यात येत असते. उन्हाळी प्रशिक्षण शिबीर सकाळी 6.30 ते 9 आणि सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंतच्या वेळेत जिल्हा क्रीडा संकुलासह इतर ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.

खेळांमध्ये फुटबॉल प्रशिक्षक महमद शेख (मो.8788360313), खो-खो प्रशिक्षक संतोष वाबळे (मो.7588169493), तलवारबाजी प्रशिक्षक विजय गाडेकर (मो.9271783313), योगासन प्रशिक्षक देवानंद चित्राल (मो.9421687666), कबड्डी प्रशिक्षक  रवी ढगे (मो.9503556809), तायक्वांदो प्रशिक्षक  मयुर पिवळ (मो.7721094109), टेनिक्वाईट व नेटबॉल आणि सेपाक टकरा प्रशिक्षक शेख चाँद (9822456366), स्केटींग व बॉक्सींग प्रशिक्षक सय्यद निसार (मो.9764333166), आर्चरी प्रशिक्षक सचिन टेकुर (मो.8983608413), सॉफ्टबॉल आणि बेसबॉल प्रशिक्षक (मो.9011854192) आदी क्रीडा मार्गदर्शकांशी संपर्क साधून खेळाडूंनी नाव नोंदणी करावी व उन्हाळी प्रशिक्षण शिबिरास दि. 3 मे 2023 रोजी सकाळी 6.30 वाजता उपस्थित रहावे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.