जालना – जिल्ह्यात आज सलग चौथ्या दिवशी देखील अवकाळी पावसानं हजेरी लावली, जिल्ह्यातील अंबड, जाफराबाद तालुक्यात विजेच्या कडकडासह आणि वादळा वाऱ्यासह सह पाऊस झाला.तर जालना शहरासह ग्रामीण भागात रिमझिम पाऊस झाला.अनेक ठिकाणी विजा कोसळल्या.घनसावंगी तालुक्यातील देवीदहेगाव भागांत देखील विज कोसळल्याची घटना घडली.या घटनेत देवीदहेगाव शिवारातील 225 गट नं. मध्ये शेतात झाडाजवळ बांधण्यात आलेल्या दोन बैलांचा जागीच मृत्यू झाला.नामदेव आसाराम शिंदें या शेतकऱ्याच्या मालकीचे हे बैल होते. शुक्रवार दि. 28 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती कळताच ग्रामसेवक,तलाठी, सरपंच, उपसरपंच यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळीच बैलांचे शवविच्छेदन केले.घटनास्थळी घटनेचा पंचनामा करण्यात आला असून एक लाख साठ हजार रू. चे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.
अचानक दोन बैल दगावल्याने शेतकऱ्यावार मोठे संकट कोसळले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.