बदनापुर – तालुक्यातील बाजार वाहेगांव येथील कापसाचे व्यपारी नामदेव उत्तमराव काळे हे दिनाक २८ शुक्रवार एप्रिल रोजी कामा निमित्त कार क्रमाक. एम एच 21 BQ 0588 घेऊन बदनापुर येथे आले होते त्यानी आपली कार जालना औरंगाबाद महामार्ग बदनापुर शहरातील गुरुदेव कलेक्शन समोर उभी करून बनियान घेण्यासाठी कापड दुकानात गेले हया संधिचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानी कारची काच फोडून कारमध्ये ठेवलेली 451600 रुपयाची बॅग लंपास केली
काळे यांनी दुकानातुन बाहेर येऊन बघितले असता त्याना आपल्या कारची काच फुटलेली दिसली असता त्यानी कारमध्ये ठेवलेली पैशाची बॅग गायब झाल्याची दिसली
घटनेची माहिती पोलीसाना मिळताच पो. नि . शिवाजी बंटेवाड व त्याची टिम घटनास्थळी दाखल झाली व गुरुदेव कलेक्शनचे CCTV फुटेज तपासले व नंतर बॅक ऑफ महाराष्ट्र चे ही CCTV फुटेज तपासले
कापसाचे व्यापारी यांनी पोलीसात येऊन फिर्याद दिली असता कलम 379 भादंवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
पुढील तपास पो. हे.कॉ. मान्टे हे करीत आहेत..