मुख्यमंत्री सहायता मदत कक्षा अंतर्गत 51 रुग्णांना अर्थसाह्य मिळवून दिल्याबद्दल अंभूरे यांचा सत्कार

25

परतुर । प्रतिनिधी – शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे परतूर तालुकाप्रमुख दत्ता अंभुरे यांनी मुख्यमंत्री सहायता मदत कक्षाअंतर्गत जालना जिल्ह्यातील 51 गरजू रुग्णांना दत्ता अंभुरे यांनी शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर व जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थसहाय्य रुग्णांना प्राप्त करून दिल्याबद्दल शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर व शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांनी त्यांचे कौतुक करून सत्कार सन्मान करण्यात आला आहे.अंभूरे यांच्या विशेष कामगिरीबद्दल सर्व मित्र परिवाराकडून त्यांचे कौतुक होत आहे येणार्‍या काळात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून कुठल्याही रुग्णाला आर्थिक सहाय्य कमी पडू देणार नाही. व ज्या रुग्णांना मुख्यमंत्री सहायता कक्ष अंतर्गत मदत हवी असेल त्यांनी तात्काळ माझ्याशी संपर्क साधावा मो.न.9421114661 असे शेवटी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे परतूर तालुकाप्रमुख दत्ता अंभुरे यांनी सांगितले आहे .