श्रीमद्  भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा

47
परतूर | प्रतिनिधी – शहरातील पवार काँलनी येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा.आरंभ दि.२१/०४/२०२३, व सांगता दि.२७/०४/२०२३,या दरम्यान कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे.श्रीमद् भागवत कथा दुपारी ०१, ते ०४,या वेळेत ठेवण्यात आली आहे.भागवताचार्य श्री.ह.भ.प.हरिदासजी महाराज दांगट, ( रेवलगावकर.) किर्तनकार ह.भ.प.लक्ष्मण महाराज साबळे,( घाणेगावकर.) भागवत कथा व किर्तनासाठी  भाविकांची मोठ्या प्रमाणात  उपस्थिती होती.संयोजक पवार काँलनी मित्र मंडळ व गंगाधर ( बापू ) पवार, नामदेव तनपुरे, दत्तात्रय वायाळ,दशरथ कातारे,पिराजी खालापुरे,धर्मा चव्हाण,अशोकराव चव्हाण,प्रल्हाद काकडे, कुंडलीक जाधव, रंजित बोराडे, संतोषभाऊ कदम, सुनिलभाऊ  गुजर,नारायणराव रोकडे,लहु बिजुले यांनी परिश्रम केले.