शेख चाँद पी.जे. राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानीत

37

जालना | प्रतिनीधी – अमळनेर कला व क्रीडा शिक्षक समन्वय समिती, धुळे तसेच अमळनेर तालुका क्रीडा समिती, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मोत्सव निमित्ताने राज्यस्तरीय गुण गौरव सोहळा नुकताच अंबिका मंगल कार्यालय, अमळनेर येथे आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमात जालना जिल्ह्याचे क्रीडा संघटक शेख चाँद पी.जे. यांना त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील गत 20 वर्षापासुन करत असलेल्या ऊत्कृष्ट कार्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पुरस्कार 2022-23 सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार शिरीष चौधरी होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. स्मिता वाघ, खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष हरी भिका वाणी, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, अमळनेर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, मेजर राजेंद्र श्याम यादव, महेंद्र सुदाम महाजन, धार सरपंच दगडू सैंदाणे हजर होते.
शेख चाँद पी.जे. यांना यापुर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना यांच्या वतीने दिला जाणारा गुणवंत क्रीडा कार्याकर्ता पुरस्कार तत्कालीन पालकमंत्री राजेशभैय्या टोपे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते मिळालेला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल शेख चाँद पी.जे. यांचे मित्र परिवाराच्या वतीने अभिनंदन होत आहे.