भोकरदन । प्रतिनिधी – आज आम आदमी पार्टिच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी नगरपरिषद भोकरदन यांची भेट घेतली भोकरदन शहरात सध्या पाणीटंचाई जाणवायला लागली आहे. जुईधरणामध्ये पाणीसाठा कमी झालेला आहे.भविष्यात मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागु नये यासाठी बाणेगांव येथील तलावातुन पाणी आणण्याची व्यवस्था करण्यात यावी.यासह आम आदमी पार्टिने वेळोवेळी केलेल्या मागण्या बाबत कार्यवाही करण्यासाठी निवेदन देण्यात आल्याचे बोरशे गुरुजींनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले.यावेळी भोकरदन शहराध्यक्ष महेजादखान ,तालुका अध्यक्ष सोळंके पाटील, यांच्यासह पार्टीचे कार्यकर्ते सत्तार शहा,प्रभाकर सुरडकर,अर्जुन तळेकर, गणेश वाघ,सचिन तळेकर, राजीव वाडेकर, कृष्णा तळेकर, संजय क्षिरसागर, मतीन शहा, मोहसीन शहा, शेख सरफराज, महंमद युनूस,दादाराव गारखेडे, मनोहर गायकवाड, सुनील जैन, हरिदास पगारे, शेख साबिर,राहुल पारखे,जैन टेलर्स.इ.
या बाबत सविस्तर असे की, ऑक्टोबर नोव्हेंबर 2022 मध्ये शहरातील साफसफाई करण्यासाठी 58 दिवस साखळी उपोषण आम आदमी पार्टिच्या कार्यकर्त्यांनी केले होते. यापुढे खालील मागण्या साठी संघर्ष चालुच राहणार असल्याचे बोरशे गुरुजी म्हणाले, साफसफाई, स्वच्छता, निर्जंतुकीकरण केलेले शुद्ध पाणी यासह मूलभूत सुविधा जनतेला देण्यामध्ये शिथीलता आलेली आहे.संबधीतांना कार्यरत ठेवण्यात यावे.
केळणा नदीच्या नदीपात्रामध्ये संपूर्ण भोकरदन शहराचे पाणी जात असून नदीला गटाराचे स्वरूप आले आहे. यासंदर्भात तात्काळ योग्य कार्यवाही करावी.
शिवाजी मार्केटमध्ये अतिशय दुर्गंधी असून संबंधित दुकानदारांना त्याचा अतिशय त्रास होतो ही बाब वेळोवेळी आपल्या निदर्शनास आणून देण्यात आलेली आहे.तात्काळ कार्यवाही व्हावी.
संभाव्य पाणीटंचाईचा विचार करुन योग्य कार्यवाही व्हावी.जसे बाणेगाव धरणातून पाण्यासाठी प्रस्ताव.
नगरपरिषद हद्दीमध्ये असणार्या मोकळ्या जागा (ओपन स्पेस) विवीध उपक्रम राबवुन अवैध अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावे.
2017 पासूनच्या नगरपरिषदेने केलेल्या कामाच्या बाबतीत इस्टिमेट आणि वर्क ऑर्डर ची मागणी पार्टीतर्फे आपणाकडे करण्यात आलेली आहे.संबधीत माहितीतात्काळ देण्यात यावी.
आम आदमि पार्टि राष्ट्रिय पार्टि आहे हे ज्ञात असावे.पार्टि मार्फत फक्त जनतेसाठी मागण्या करण्यात येतात.वैयक्तिक लाभासाठी नाही.
नगरपरिषदेकडुन आवश्यक माहिती देण्यात येत नसल्यामुळे आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मागणी करुनही पार्टीला मिळत नसल्यामुळे एखादेवेळी ऐनवेळी पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यास आणि अनुचित प्रकार घडून आल्यास याची सर्वस्वी जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची राहील असे बजावण्यात आले असुन जनहितासाठी तीव्र आंदोरन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे.ना शिवाय पर्याय राहणार नाही.
असेही बोरशे गुरुजी म्हणाले.