जालना । प्रतिनिधी – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदार यादीत ज्या ज्या मतदार संघात नाव असेल त्या त्या ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार असल्याचा अध्यादेश आज राज्य सरकार तर्फे जारी करण्यात आला असल्याची माहिती राज्याची माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात दिली आहे. पुढे बोलताना आमदार लोणीकर म्हणाले की मंठा परतूर आणि आष्टी या ठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक चालू असून मतदारांपैकी अशी काही मतदार आहेत की जे ग्रामपंचायत सदस्य असूनही सोसायटी मध्ये ही सदस्य आहेत. अशा मतदारांना फक्त ग्रामपंचायत किंवा सोसायटी यापैकी एकाच ठिकाणी मतदान करता येणार होते. प्राधिकरणाने तसा अध्यादेशही काढला काढला होता. अशा मतदारांची लक्षणीय संख्या आष्टी परतूर आणि मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदार संघात असल्याने. अशा सर्व मतदारांना सोसायटी मतदार संघात व ग्रामपंचायत मतदार संघात दोन्ही ठिकाणी मतदान करता यावे म्हणून आज दिनांक 27 एप्रिल रोजी गुरुवारी सकाळी राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी आपण दूरध्वनी वरून संपर्क साधून विनंती केली होती. त्यांनी माझ्या विनंतीला सन्मानपूर्वक मान देऊन प्राधिकरणाने काढलेला चुकीचा अध्यादेश रद्द करण्याच्या सूचना करत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सोसायटी आणि ग्रामपंचायत मध्ये दोन्ही मतदार यादीत नाव असलेल्या उमेदवारांना न्याय देण्याकरिता अध्यादेश जारी केला असल्याने आपण राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे जाहीर आभार मानत असल्याचे ही या पत्रकात नमूद केले आहे.