न.प. अभियंत्याची विभागीय चौकशी करा अन्यथा उपोषण, दिनेश नंद यांचा ईशारा

81

जालना । प्रतिनिधी – हलगर्जीपणा आणि बेजबाबदार पणा केल्याचा आरोप करत न.प. अभियंता सय्यद सऊद यांची विभागीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशी न केल्यास येत्या 1 मे पासून उपोषण करण्याचा ईशाराही दिनेश चुन्नीलाल नंद यांनी दिला आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी व नगर परिषद प्रशासक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जालना नगर परिषद बांधकाम विभागाचे अभियंता सय्यद सऊद यांच्या हलगर्जी व बेजाबदारपणा आणि गैरप्रकार व भ्रष्टाचारामुळे दिनेश नंद यांचे राहते घर गटारीचे पाणी शिरून पडले होते. त्याविरोधात अनेक तक्रारी करण्यात आल्या मात्र, अद्यापपर्यंत संबंधीत अभियंत्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. अभियंता यांची विभागीय चौकशी होत नाही तोपर्यंत येत्या 1 मे महाराष्ट्र दिनापासून उपोषण करण्याचा ईशारा दिनेश नंद यांनी दिला आहे.