परतूर | प्रतिनिधी- परतूर नगरपरिषद अतर्गत दिले जाणारे प्रमाणपत्र नागरिकांना देण्यात यावे या मागणीचे निवेदन मंगळवार दि.२५ राष्ट्रवादी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात याच्या नेतृत्वा खाली नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी गंगाधर पेंटे याना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,नागरिकांना हवे असलेले प्रमाणपत्र संबधीत विभागाचे आधिकारी देण्यास टाळाटाळ करत आहे यामुळे नागरिकांना नागरिक त्रस्त झाले आहेत.याकडे लक्ष घालून नागरिकांना वेळोवेळी लागणारे प्रमाणपत्र उपलब्ध करून दयावे,तसेच शहरातील हातपंप दुरुस्ती करण्यात यावी सह आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहे.
निवेदनावर मा.नगराध्यक्ष विनायक काळे,विनय राखे,अंकुश तेलगड,आरेफ आली,सत्तार कुरेशी,विजय राखे,कदीर कुरेशी,इफतेखार काजी,इब्राहिम कायमखाणी,परवेज देशमुख,रज्जाक कुरेशी,संजय राऊत,लाल मिया तांबोळी,मजाज अन्सारी,बबलू पठाण,आदींच्या साह्य आहेत.