जालना – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा-2023 चे रविवार दि.30 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. जालना शहरातील जिल्हा केंद्रावरील एकुण 28 उपकेंद्रावर महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परिक्षेचे आयोजन करण्यात आले असून एकुण 7 हजार 584 उमेदवार परिक्षा देणार आहेत. तरी संयुक्त परिक्षा सुरळीतपणे पार पडण्याच्या उद्देशाने परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिला 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे. असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी जारी केले आहेत.
जालना जिल्ह्यातील मस्त्योदरी शिक्षण संस्था कॉलेज ऑफ इंजिनियरींग ॲन्ड टेक्नॉलॉजी नागेवाडी जालना, शासकीय तंत्रनिकेतन नागेवाडी जालना, बद्रीनारायण बारवाले कॉलेज जालना,अंकुशराव टोपे कॉलेज जालना, सीटीएमके गुजरातील हायस्कुल जालना, नुतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जुना जालना, राष्ट्रीय हिंदी विद्यालय देऊळगाव राजा रोड जालना, आरजी बागडीया कला व एसबी लखोटीया वाणिज्य आणि आर बेंन्झोंन्जी विज्ञान महाविद्यालय जालना, श्री एमएस जैन इंग्लिश स्कुल जालना, राष्ट्रीय हिंदी विद्यालय जालना, उर्दू हायस्कुल व ज्युनियर कॉलेज जालना, सेंट मेरी हायस्कुल जालना, जिल्हा परिषद मुलींची शाळा जालना, श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालय जालना, श्री एमएस जैन विद्यालय जालना, रयान इंटरनॅशनल स्कुल जालना, विद्यांचल शिक्षण संस्था व्हीएसएस कॉलेज जालना, जिल्हा परिषद मुलांची शाळा जालना, शासकीय तंत्रनिकेतन अंबड, मत्स्योदरी विद्यालय अंबड, मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अंबड, ओम शांती विद्यालय अंबड, आरपी इंटरनॅशनल स्कुल बदनापूर, निर्मल क्रीडा आणि समाज प्रबोधन ट्रस्टचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय बदनापूर, रावसाहेब पाटील दानवे कॉलेज ऑफ फार्मसी बदनापूर, श्रीमती मथूरादेवी महाविद्यालय बदनापूर, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बदनापूर आणि श्री सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जालना या 28 उपकेंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे.
संयुक्त परिक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात सर्व सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी बुथ, फॅक्स, झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके परीक्षेच्या कालावधीत बंद ठेवावेत. आदेशाच्या अंमलबजावणीसाठी नोटीस देण्यास पुरेसा कालावधी नसल्याने व परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 (2) नूसार आदेश एकतर्फी काढण्यात आला आहे. या आदेशाची प्रसिध्दी पोलिस अधिक्षक जालना यांनी ध्वनीक्षेपकाद्वारे करावी. हा आदेश दि.30 एप्रिल 2023 रोजीचे सकाळी 9 वाजेपासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत अंमलात राहील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.