परतूर । प्रतिनिधी – रिटेल अँड होलसेल केमिस्ट असोशीएशन संघटनेच्या परतूर तालुकाध्यक्ष पदी निहिल सकलेचा, रखमाजी कोल्हे व दत्ता गिरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
निहित सकलेचा यांच्या मागील नऊ वर्षातील उत्कृष्ट कामगिरी पाहता तालुक्यातील केमिस्ट सभासदांनी निहित सकलेचा व दत्ता गिरी यांची तालुकाध्यक्ष पदी बिनविरोध निवडून केली. जालना जिल्ह्यात परतुर तालुका येथे मतदान झाले नाही. पन्नास केमिस्ट सदस्यातून एक तालुकाध्यक्ष निवड करण्यात आला आहे. परतूर तालुक्यातील 154 केमिस्ट सदस्यातून तीन तालुकाध्यक्ष बिनविरोध निवडून आले. बिनविरोध निवडून आलेल्या तालुकाध्यक्षाचा सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.