जालना – मुस्लीम बांधवांनी रमजान महिन्यातील पावित्र आपल्या जिवनात आणले तर खर्या अर्थाने त्यांचे जिवनमान उंचविल्याशिवाय राहणार नाही म्हणून मुस्लीम बांधवांनी इस्लाम धर्माची माणुसकीची शिकवण दैनंदिन जिवनामध्ये आणलीच पाहिजे असे आवाहन आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.
रहेमानगंज येथे रहिम तांबोळी यांनी आयोजित केलेल्या इद मिलन कार्यक्रमात श्री गोरंट्याल हे बोलत होते. यावेळी व्यासपिठावर शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, माजी नगरसेवक सय्यद अजहर, सामाजिक कार्यकर्ते सय्यद जमिल, आजम खान आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना गोरंट्याल म्हणाले की, इस्लाम धर्मामध्ये शिक्षणाला फार महत्व दिलेले आहे. परंतू, या समाजामध्ये शिक्षणाचा अभाव असल्यामुळे हा समाज आज देखील मागासलेला दिसून येतो. मुस्लीम समाजाने शिक्षणाबरोबरच इस्लाम धार्माची शिकवण आत्मसात केल्यास निश्चितपणे त्यांचा चौफेर विकास झाल्याशिवाय राहणार नाही. कार्यक्रमाच्या प्रारंभी संयोजक रहिम तांबोळी यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल आणि पुष्पहार घालुन स्वागत केले. याप्रसंगी दत्ता घुले, अरूण घडलिंग, सय्यद अयुब, शेख लतीफ, शेख कलीम, किशोर कदम, शेख अखबर, सय्यद इफ्तेखार, सय्यद रिजवान आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचलन काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राधेश्याम जैसवाल यांनी केले.