राज्यातील पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या

23

मुंबई – शिंदे-फडणवीस सरकारने 30 वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. तर काही अधिकार्‍यांची पदोन्नती करण्यात आली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते, मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचाही समावेश आहे. शिंदे फडणवीस सरकारने प्रथमच आयुक्त आणि पोलीस महासंचालकपदावरील अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी (कायदा व सुव्यवस्था) बदली करण्यात आली आहे. तर रितेश कुमार यांची पुणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्याला लागून असलेल्या पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी विनय कुमार चौबे यांची नियुक्ती केली गेली आहे. मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांची दहशतवाद विरोधी पथकाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली गेली आहे. मुंबईचे सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था ) असलेले विश्वास नांगरे पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी पदोन्नती करण्यात आली आहे. विनाय कुमार चौबे यांची या पदावरून बदली झाल्याने या रिक्तपदावर नांगरे पाटील यांची बदली करण्यात आली आहे.
मिलिंद भारंबे यांची नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी पदोन्नती करण्यात आली आहे. ते मुंबईत विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था ) या पदावर होते. यासह मुंबईचे सह पोलीस आयुक्त (वाहतूक) राज वर्धन यांची अप्पर पोलीस महासंचालक (सुरक्षा मंडळ) पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. निकेत कौशिक यांची अप्पर पोलीस महासंचालक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ) पदी बदली करण्यात आली आहे.