समृद्धी महामार्गावर अपघात; दोघे गंभीर जखमी

19

जालना – महाराष्ट्रातील सार्वाधिक सुरक्षित म्हणल्या जाणार्‍या समृद्धी महामार्गावर पुन्हा एका कारचा अपघात झाला आहे. सांगण्यात येते की, कुत्रा मध्ये आल्यामुळे हा अपघात झाला आहे. या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलीसांनी जखमींना उपचारासाठी जालन्यातील हॉस्पीटलमध्ये दाखल केले आहे. हे दोघे गोंदिया कडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात असतांना सुमारे एक वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.