अक्कलकुवा – डॉक्टर ,इंजिनिअर या पदांच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना नीट, जेईई या पात्रता परीक्षा द्याव्या लागतात. या पात्रता परीक्षा पास होण्यासाठी क्लाँसेस लावावे लागतात.या क्लाँसेसचा खर्च वर्षाला दोन ते चार लाख रुपये येतो.आदिवासी विद्यार्थी लाखोंचा एवढा खर्च कोठून करणार ? असा प्रश्न उपस्थित करत महाज्योतीच्या धर्तीवर टिआरटिआयनेही आदिवासी विद्यार्थ्यांना डाँक्टर, इंजिनिअर या पदांच्या अभ्यासक्रमासाठी द्यावी लागणारी नीट,जेईई पात्रता परीक्षेच्या तयारी करीता पुर्व परीक्षा मोफत आँनलाईन प्रशिक्षण देण्याची मागणी ट्रायबल फोरम नंदुरबार या संघटनेने केली आहे.
या संदर्भात आदिवासी मंत्री डॉ. विजयकुमार गावित,आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांना मा.तहसीलदार यांच्या मार्फत पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.
विद्यार्थ्यांची डॉक्टर व इंजिनिअर बनण्याची इच्छा असली तरी पालकांची आर्थिक परिस्थिती व क्लाँसेसची फी यामुळे इयत्ता दहावी नंतर अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश प्रवेश घेऊ इच्छित असलेले सामान्य व साधारण कुटुंबातील आदिवासी विद्यार्थी नीट,जेईईचे महागडे प्रशिक्षण क्लाँस लावू शकत नाही.
आदिवासी समाजातील सर्व सामान्य कुटुंबातील मुले -मुली डाँक्टर, इंजिनिअर झाले पाहिजे.यासाठी त्यांना नीट,जेईई परीक्षा पूर्व मोफत आँनलाईन प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिलेली आहे. आणि त्यातील जे विद्यार्थी इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन नीट,जेईईची तयारी करुन डॉक्टर ,इंजिनिअर होण्याची स्वप्ने बाळगून आहे.
अशा आदिवासी विद्यार्थ्यांना नीट व जेईईचे परीक्षा पुर्व मोफत आँनलाईन प्रशिक्षण देण्यासाठी योजना तयार करुन प्रशिक्षण देण्यात यावे.अशी मागणी ट्रायबल फोरमने केली आहे.
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेने ओबीसी,व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी नीट,जेईई मोफत प्रशिक्षण असलेली चांगली योजना तयार केलेली आहे.
याच धर्तीवर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्धेने सुद्धा आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अशीच योजना तयार करुन लाभ द्यावा म्हणून पत्रव्यवहार केलेला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन तडवी, जिल्हा सचिव रविंद्र वळवी, कोषाध्यक्ष वसंत वसावे, सिमाताई वडवी, सुनील वसावे, रवी पावरा, तेजस पाडवी आदींची उपस्थिती होती.