विहिरीचा परस्पर फेर केला; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

7

जाफराबाद । प्रतिनिधी – तालुक्यातील हिवरा बळी येथील शेतकरी जगन लोखंडे यांच्या मालकीची विहीर परस्पर अधिकार्‍यांनी ग्रामपंचायत च्या नावाने केल्याने संबंधित अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करून मला न्याय मिळावा या उद्देशाने श्री लोखंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.
या संदर्भात सविस्तर माहिती अशी की जगन लोखंडे यांची तालुक्यातील हिवरा बळी येथे गट क्रमांक 164 मध्ये 1 हेक्टर 31 आर वडिलोपार्जित जमीन असून या जमिनीत स्वतः च्या मालकीच्या दोन स्वतंत्र विहीर आहेत.
लोखंडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या अर्जात नमूद केले आहे की ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, व तहसीलदार जाफराबाद यांनी मला कुठलेही विचारपूस न करता बनावट कागदपत्रांच्या आधारे माझ्या मालकीची विहीर ग्रामपंचायत च्या नावे करून अकलेचे तारे तोडले आहे.
तालुक्यातील अधिकार्‍यांनी राजकीय दबाबापोटी तालुक्यात हुकूमशाही सुरू केली आहे. उध्या परस्पर शेतकर्‍यांच्या जमिनी हडप केल्या जातील माझ्या प्रकरणात दोषी असलेल्या सर्व अधिकार्‍यांवर कडक कार्यवाही करून गुन्हे दाखल व्हावे यासाठी त्यांनी उपोषण सुरू केले आहे.